Nelson

Brain Tumor

आज वर्ल्ड ब्रेन ट्युमर दिना निमत्ताने नेल्सन न्युरॉसायन्स सेंटर टीम द्वारे थोडक्यात ब्रेन ट्युमर वर माहीती प्रदान करत आहे.

‘मेंदू’ जरी नावाला शरीरातलं एक अवयव असलं तरी शरीराला त्याची भुमीका किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच अवगत आहे. परमेश्वरानी सुद्धा हे शरीर रचतांना जणू या गोष्टीची जाण बाळगली आणि मेंदूला शरीरात अग्रस्थान देऊन त्याला दणकट कवटीची ‘Z’ security सुद्धा दिली आहे. एखादया व्यक्तीचे मेंदू फक्त अवयव नसून तो त्याचा आठवणींचा, भावनांचा, शारीरीक आणि माणसिक क्षमतेचा ठेवा असतो. एखादया विदृपात पण सद्रूप शोधणारा, दुर्गुणात सद्गुण शोधणारा आणि क्षमते पलीकडचं काम पण साध्य करण्याची शक्ती देणारा मेंदूच आहे. मेंदूची ऐवढी महत्त्वाची भूमिक असतांना सुद्धा त्याचा आजार आणि संबंधीत लक्षणाकडे मनुष्य नेहमीच दुर्लक्ष करत आला आहे. सतत डोकं दुखत असतांना डोकेदुखीची वर्षानो वर्ष गोळी घेउन काम चालवून घेणाऱ्या लोकांची संख्या ही मोजण्या पलिकडेच आहे. मेंदूच्या विकारांनकडे दुर्लक्ष करत ब्रेन ट्युमर च्या अखेरच्या टप्प्या मध्ये आल्यावर डॉक्टरच्या दारात पाय ठेवणारे लोक पण काही कमी नाहीत.

हृदयविकराचा झटका येऊन मरण्यापेक्षा Brain tumor मुळे येणाऱ्या अपंगत्वाने  आजन्म उपेक्षीत आणि तीळ तीळ मरण्याची भीती कशी वाटत नाही? Brain Tumour म्हणजे मेंदूत होणाऱ्या गाठी. या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात, कर्करोग आणि दुसऱ्या साध्या गाठी.  कर्करोगाच्या (Cancer च्या) गाठींचा उगम मेंदूच्या ज्या भागातून होतो त्याप्रमाणे त्यांचे प्रकार ठरतात.

 

उदा.- कवटी पासून होणारे ट्युमर/ मेंदूच्या आवरणापासून होणारे ट्युमर – Meningioma

मेंदुच्या स्नायूंपासून होणारे ट्युमर – Glioma

मेंदूतून निघणाऱ्या नसांपासून होणारे ट्युमर – Schwanema.

मेंदूच्या रक्तवाहिण्यां पासून होणारे ट्युमर – AVM Aneurysm , Cavernoma.

पण यापेक्षा सामन्य माणसाच्या द्रुष्टीकोणातून जास्त महत्वाचं जे आहे ते म्हणजे ब्रेन ट्युमर ची लक्षणे. सतत होणारी डोकेदूखी, मळमळ व उल्टी हि ब्रेन ट्युमर चे प्रमुख लक्षणे आहेत. त्याच बरोबर फीट (अपस्मार), एका हाता पायाची कमजोरी किंवा लखवा, नजर कमजोर होणे, कमी ऐकू येणे आणि चालतांनी तोल जाणे, चेहऱ्याचा लखवा, ही पण ब्रेन ट्युमर ची लक्षणे आहेत. अशा लक्षणांची चाहूल लागताच Neurosurgeon कडे धाव घेणे आवश्यक आहे. दिर्घ काळ वेगवेगळ्या तपासण्या / निदान न करता स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनून ब्रेन ट्युमर कडे लक्ष न दिल्याने पेशंटच्या अडचणी वाढतात. वेळेत निदान व शिघ्र उपचार केल्यास ब्रेन ट्युमर यशस्वीपणे शस्त्र करुन काढता येतो व येणाऱ्या दीर्घ अपंगत्व व जिवहनी पासून बचाव करता येतो. पण Neurosurgeon कवटी तोडून मेंदूला उघडून त्यातली गाठ काढतील… असे आपल्या डोळ्यासमोर येणारे चित्र जरी भयावह असले तरी ते वास्तविक नाही. जसे कुंभाराचे चिखलाने भरलेले हाथ गलीच्छ वाटतात पण त्याच हाथाने घडवलेली मुर्ती सुंदर व हवी हवीशी वाटते; तसेच Neurosurgery/ मेंदूची शस्त्रक्रिया असते. मेंदूवर शस्त्रक्रिया करणारे Neurosurgeon, नॉर्मल मेंदूला धक्का न लावता मेंदूची गाठ काधण्यात प्रविण असतात. बहुतांश ब्रेन ट्युमरसाठी डोक्यावर लागणारा चीरा हा डोक्याच्या केसांमधूनच असल्याकारणाने, मेंदूची शस्त्रक्रिया झाल्याचे दिसत नाही. मेंदूच्या काही गाठींची शस्त्रक्रिया नाकातून केली  जाऊ शकते, अशावेळेस पेशंटचं ऑपरेशन टाके न लागता केल्या जाऊ शकते. मेंदूच्या शस्त्रक्रियांमध्ये अत्याधुनिक यंत्रांमुळे मोठी क्रांती आली आहे. Neuro navigation, Neuro monitoring , Advanced Microscope, & Neuro endoscope या अत्याधुनिक यंत्र द्वारे ‘Key hole surgery ‘ पण आज ब्रेन ट्युमरसाठी करणे शक्य झाले आहे. असेच मेंदूच्या कोणत्याही शस्त्रक्रियेत प्रभुत्व असलेल्या Neuro surgeons ची टिम आणि त्यांचा चा प्रबळ अनुभावाला जोडीशी असलेली सगळीच उपकरणे Nelson Hospital मधे उपलब्ध असून जनार्पण आहेत. मागील दोन वर्षात १०० पेक्षा जास्त ब्रेन ट्युमर काढून अनेक लोकांना जिवन दान दिले आहेत या कौशल्यवान Neurosurgeon Team ने आणि त्यांच्या अथक व निरंतर प्रयत्नांना सुरु ठेवण्याचा निरधार पण त्यांचा मनाशी घट्ट  ठेवलेला दिसतो. वेळेत निदान झाल्यास ब्रेन ट्युमर च्या शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि अडचणी कमी असतात त्याचाच फायदा Neuro surgeon ला शस्त्रक्रिया करतांना होतो आणि पेशंटला आयुष्याच्या पूर्वार्धात होतो. म्हणून…

“जाणकार रहा, जागृक व्हा

वेळेत निदान व शीघ्र उपचार”

ही गुरुकिल्ली World Brain Tumour Day चा निमित्याने सांगावीशी वाटते.

Dr. Sandeep Iratwar(MBBS, MS, DNB Neurosurgery, MBA Hospital Administration, Consultant Neurological Surgeon)

Dr. Sanjay Ramteke (Senior Consultant Neurologist)

Dr. Shrikant Kalbagwar (MBBS, MS, MCH Neurosurgery (Mumbai), Consultant Neurosurgeon)

Dr. Jeevan Kinkar (Consultant Neurologist)

Nelson Hospital, Behind “The Hitvada Press” Wardha Road, Dhantoli, Nagpur. Call: 9518951959